मज्जातंतू नलिका दोष — दुर्मिळ परंतु गंभीर जन्म दोष / Neural tube defects — rare but severe birth defect

Animish Joshi
2 min readJul 2, 2021

मराठी & English

मज्जातंतू नलिका दोष म्हणजे काय ?

मज्जातंतू नलिका जन्मानंतर २८ दिवसांनी बंद होते. मज्जातंतू नलिका अपूर्णपणे बंद झाल्यास सामान्यत: एन्सेफॅली (मेंदूतील दोष) किंवा स्पाइना बिफिडा (पाठीच्या कणाचा दोष) मध्ये परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान अश्या प्रकारचे जन्मदोष फार लवकर विकसित होतात, एखाद्या महिलेला गर्भवती असल्याचे माहित होण्यापूर्वीच अनेकदा याची सुरुवात होते.

कारणे ?

मज्जातंतू नलिका दोषांचे कारण निश्चित नाही, परंतु ते अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या संयोजनामुळे दिसून आले आहे. केवळ इतकेच न्हवे गर्भवती महिलेच्या शरीरातील सूक्ष्म पोषक तत्वांच्या स्थितीचा परिणाम देखील मोठा आहे. मुख्यतः शरीरात फोलिक ॲसिड ची कमतरता असल्यास अश्या जन्मादोशांचा धोका वाढतो.

काय केले जाऊ शकते ?

मज्जातंतू नलिका दोष टाळण्यासाठी नियमित अन्न स्त्रोत आणि सप्लीमेंट द्वारे फॉलिक ॲसिड चे प्रमाण वाढविणे महत्वाचे आहे. गर्भधारणेपूर्वी किमान ३ महिन्यांपूर्वीपासून फोलिक ॲसिड चे सेवन केले पाहिजे. फोलेटच्या चांगल्या स्त्रोतांमधील हिरव्या पालेभाज्या, फळ (मोसंबी, संत्री, केळी, इ.), शेंग आणि फोर्टिफाइड धान्य यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. फॉलिक ॲसिड व्यतिरिक्त इतर जीवनससत्वे आणि खनिजे यांचे देखील सेवन करणे तितकेच महत्वाचे आहे.

What is neural tube defects?

The neural tube is closed 28 days after birth. If the neural tube is not completely closed most commonly this results in anencephaly (a brain defect) or spina bifida (a spinal cord defect). Such types of birth defects develop very early during pregnancy, generally even before a woman knows she is pregnant.

Causes?

The cause for neural tube defects is not definite, but it appears to be due to a combination of genetic and environmental factors. Not only this maternal micronutrient status also impacts largely. Particularly if there is a deficiency of folic acid, the risk of such birth defects increases.

What can be done?

For preventing neural tube defects, it is important to increase regular folic acid intake via food sources and supplements. Folic acid should be taken at least 3 months prior to pregnancy. Among the good sources of folate, it is important to include green leafy vegetables, fruits (sweet lime, orange, banana, etc.), legumes and fortified grains in the diet. It is equally important to take other vitamins and minerals besides folic acid.

--

--

Animish Joshi
0 Followers

Post-graduate student of Public Health Nutrition