कमी वजनाची बाळे- सामाजिक आरोग्य समस्या / Low birth weight- a public health problem

Animish Joshi
2 min readJul 2, 2021

मराठी & English

कमी वजनाचे बाळ म्हणजे काय ?

जन्मानंतर बाळाचे वजन २५०० ग्रॅम पेक्षा कमी असल्यास ‘कमी वजनाचे बाळ’ असे म्हटले जाते.

याचे अनेक लघु आणि दीर्घकालीन परिणाम आहेत. जगभरातील जवळपास १५ ते २० टक्के (प्रतिवर्ष २० दशलक्षाहून अधिक) अर्भक कमी वजनाने जन्माला येतात. आयुष्याच्या पहिल्या महिन्यात या मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते आणि जे जगले त्यांना आयुष्यभर विविध परिणामांना सामोरे जावे लागते जसे उंची खुंटणे, कमी IQ, संसर्ग होणे, हायपोक्सिया, हायपोग्लायसेमिया, मधुमेह इ.

कारणे ?

या समस्येची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही म्हणजे अकाली जन्म, इंट्रायुटरिन ग्रोथ रिस्ट्रीक्षन (गरोदरपणात गर्भाची वाढ अपेक्षे प्रमाणे न होणे), गरोदरपणात उच्च रक्तदाब किव्हा मधुमेह, संसर्ग होणे, कठोर शारीरिक कार्य, एकाधिक जन्म, मानसिक ताणतणाव, अपुरा पौष्टिक आहार, इ.

काय केले जाऊ शकते ?

या समस्येला आळा घालायचा असल्यास पौगंडावस्थेतील मुलींसाठी पुरेसे पोषण, गर्भधारणेदरम्यान आणि नंतर धूम्रपान करण्यास मनाई, लोह आणि फोलिक ॲसिड ची कमतरता असल्यास सपलीमेंट घेणे, संसर्ग न होऊ देण्याची काळजी घेणे तसेच दोन जन्मात अंतर ठेवणे, गर्भाच्या वाढीची देखरेख आणि नवजात बाळाच्या आकाराचे मूल्यांकन करणे, जन्मानंतर लगेचच (पहिल्या १ तासात) व पहिल्या ६ महिन्यात केवळ स्तनपान, तसेच आईला सूक्ष्म पोषक तत्वांसह पुरेसा आहार असणे अत्यंत महत्वाचे आहे. सुधृड समाजासाठी व भविष्यासाठी माता आणि बाल आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

What is Low Birth Weight?

If the baby’s weight is less than 2500 grams after birth, then it is termed as ‘low birth weight’.

It has many short- and long-term consequences. Nearly 15 to 20 percent (more than 20 million per year) are born with low birth weight. In the first month of life, these children are more likely to die and those who survive, face various issues like stunting, low IQ, more prone to infections, hypoxia, hypoglycaemia, diabetes, etc.

Reasons?

There are multiple reasons for this problem, some of them are preterm birth, intrauterine growth restriction (foetus does not grow as expected), hypertension or diabetes during gestation, infection, hard physical work, multiple births, mental stress, inadequate nutritious diet etc.

What can be done?

To curb this issue adequate nutrition for adolescent girls, promotion of smoking cessation during and after pregnancy, intermittent iron and folic acid supplements for women of reproductive age and adolescent girls, prevention from infections, birth spacing, foetal growth monitoring and neonatal size evaluation, early initiation of breastfeeding (within 1 hour), exclusive breastfeeding for first 6 months, an adequate diet including micro-nutrients is very important. It is necessary to focus on maternal and child health for a better society and future.

--

--

Animish Joshi
0 Followers

Post-graduate student of Public Health Nutrition